रेल्वे परिसरात गुन्ह्यांची वाढ - २0१४ मध्ये ६६,८0९ गुन्हे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2015

रेल्वे परिसरात गुन्ह्यांची वाढ - २0१४ मध्ये ६६,८0९ गुन्हे

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : विनातिकीट प्रवास करणारे, टपावरून प्रवास करणारे स्टंटबाज, महिला-अपंगांच्या डब्यात घुसणारे, नशा करून लोकलच्या डब्यात दंगा करणार्‍यांच्या संख्येत २0१४ मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मध्य रेल्वेवर रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ ) वर्षभरात केलेल्या कारवाईत गुन्ह्यांची वाढ झाली आहे. २0१३ च्या तुलनेत २0१४ मध्ये आरपीएफने केलेल्या कारवाईत सुमारे ८५0 गुन्ह्यांची वाढ झाली असून दंडवसुलीतही २0 लाखांनी भर पडली आहे. त्याच वेळी आरपीएफने जवानांसाठी प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे धडे देण्यासाठी विशेष प्रशिक्षण हाती घेतले आहे. 

मध्य रेल्वे आरपीएफने जानेवारी ते २८ डिसेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईची संख्या ६६,८0९ वर पोहोचली आहे. २0१३ या वर्षात ही संख्या ६५,९५१ इतकी होती. करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईतून १ कोटी ७८ लाख ३१ हजार ५८0 रक्कम वसूल करण्यात आली, तर २0१३ मध्ये दंडवसुलीची रक्कम १ कोटी ५८ लाख ३१ हजार ५0२ इतकी होती. रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार्‍या आरपीएफतर्फे नियमांचा भंग करणार्‍या प्रवाशांवर कारवाई केली जाते. यंदाच्या वर्षी सर्वाधिक कारवाई डब्यांमध्ये फिरणार्‍या भिकार्‍यांवर करण्यात आली आहे. १८,३६0 भिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. आरपीएफ ने त्यांच्याकडून सर्वाधिक म्हणजेच ७0 लाख ४७ हजार ५८५ इतकी वसुली केली आहे. नशेच्या धुंदीत प्रवास करणार्‍या ३,३४७ प्रवाशांकडून ६ लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे.

आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवास करणार्‍या सुमारे ३१ हजार प्रवाशांकडून ५७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या ४१३३ रोमिओंकडून १ लाख १७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे रूळ ओलांडणार्‍या ५९00 जणांकडून ९ लाख ७१ हजारांपेक्षाही जास्त दंड आकारण्यात आला आहे. तसेच विनाकारण लोकल डब्यातील साखळी ओढून गाड्या थांबवण्याचा उद्योग करणार्‍या ५६१ जणांकडून ३ लाख ४0 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणार्‍या ५३७ प्रवाशांकडून ४ लाख २0 हजारांचा दंड आक ारण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS