मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महापालिकेने मधुमेह, डेंग्यू आणि मलेरियाबाबत जनजागृतीसाठी बेस्टच्या १६० बसगाड्यांवर तर 'रेडिओ मिर्ची' या एफएम रेडीओच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातींवर एका महिन्यात २५ लाख रुपये खर्च केले आहेत. एकीकडे पालिका थंडीमध्ये डेंग्यूचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करत असल्याने या जाहिरातींवर झालेला खर्च वायफळ असल्याचा आरोप पालिकेच्या आरोग्य विभागावर होत आहे.
मुंबई महानगर महापालिकेने मधुमेहासंबंधी बेस्टच्या ३0 बसगाड्यांवरील जाहिरातींसाठी तीन लाख २0 हजार ९00 रुपये, मलेरिया-डेंग्यूबाबत बेस्टच्या ३0 गाड्यांवर जाहिरातींसाठी तीन लाख २0 हजार ९00 रुपये तसेच मलेरिया आणि डेंग्यूसंदर्भात बेस्टच्या १00 बसगाड्यांवरील जाहिरातींसाठी १0 लाख पाच हजार ६२२ रुपये आणि 'रेडिओ मिर्ची'वरील जाहिरातींसाठी आठ लाख ८ हजार ९२२ रुपये असे एकूण २४ लाख ५६ हजार ४१४ रुपये खर्च करण्यात आले.
महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूचे प्रमाण वाढल्याचा फायदा उचलत जाहिरातींवर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत २५ लाख रुपये खर्च केले. या खर्चाचा कार्योत्तर मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारी २ जानेवरीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. पालिकेने याआधीही ९० लाख रुपये खर्च करून २ लाख पोस्टर मुंबई मध्ये लावल्याचा दावा केला होता. पालिकेची हि पोस्टर कुठेही दिसत नाही, हि पोस्टर जास्त किमती मध्ये छापून घेतल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी करत स्थायी समितीत आरोग्य विभागाला धारेवर धरले होते. आता पुन्हा जाहिरातीवरील वायफळ खर्चामुळे स्थायी समितीत गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.