एसटी वाचवण्यासाठी कास्ट्राईबचे मुख्यमंत्र्यांना साकडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2014

एसटी वाचवण्यासाठी कास्ट्राईबचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : खाजगी वाहतूकदारांना टप्पे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी सरकार जे विधेयक आणत आहे, त्याचा वाईट परिणाम एसटी महामंडळावर होणार आहे. त्यामुळे या विधेयकाचा सरकारने फेरविचार करावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात 'कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना' चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व्ही. के. रामटेके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेतली व निवेदन दिले. या वेळी सरचिटणीस सुनील निरभवणे, कोषाध्यक्ष गणेश कांबळे, सी. डी. आढाव, येलेकर, निकाळजे, मालाधारी,घोडके, कांबळे, पाटील, लोंढे, आदीं पदाधिकारी होते. 

संघटनेच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. राज्यभरातून हजारो कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारने संघटनेच्या मागण्यांचा विचार केला नाही तर देशभरातील सर्व एससी, एसटी परिवहन संघटना फेडरेशनच्या वतीने दिल्लीत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनावर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निरभवणे यांनी सांगितले. यापूर्वी भाजपाने खाजगीकरणाला प्रोत्साहन दिलेले आहे. त्याचीच पुनरावृत्ती होत आहे, मात्र संघटना हे होऊ देणार नाही. एसटी महामंडळाच्या कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्यामुळे या आंदोलनात हजारो कामगार सहभागी झाले आहेत. यांचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली असता आपले निवेदन व मत केंद्राकडे कळवू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

Post Bottom Ad