मुंबई ( जेपीएन न्यूज ): `मुंबई मेट्रो ३` साठी जागा देण्यास आज बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. तसेच या ठिकाणीच्या जागांवर व्यावसायिक वापराच्या इमारती बांधण्यास वापरण्यात यॆणार्या एफएसआयबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल या अटींवर मंजुरी देण्यात आली आहे.
हुतात्मा चौका जवळ विद्युत संग्राही उपकेंद्राची सेनापती बापट मार्ग येथील अंबिका मिल बस स्थानकाची तसेच अंधेरी पूर्व येथील सिप्झ बस स्थानकाची जागा मुंबई मेट्रोसाठी देण्याला आज समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. कुलाबा ते वांद्रे सिप्झ हा मुंबई मेट्रो ३ प्रकल्प भुयारी असून २७ स्थानके असलेला हा मार्ग ३२. किलो मीटर लांबीचा आहे. जपान इंटर नशनल कोर्पोरशन एजन्सी यांच्या सोबत कर्ज सहाय्य घेऊन हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ पार्किंग साठी जागा हवी अशी मागणी केंद्र सरकारकडे २०२० पासून सातत्याने केल्याची माहिती बेस्टचे महा व्यवस्थापक ओ पी गुप्ता यांनी दिली त्याबाबत आपण तीन वेळा संबंधित यंत्रणा सोबत सादरीकरण केल्याची माहिती त्यांना दिली . नवीन ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीने २५ मीटर खोल जमिनीखालून हे काम केले जाणार आहे.