मुंबई : नेहमीच दगदगीचे जीवन जगणार्या मुंबईकरांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. शहरात दरदिवशी ३३ नागरिकांचा हृदयविकाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडे आकडेवारी मागितली होती.२00१ ते २0१४ या १४ वर्षांत १ लाख ६५ हजार लोक हृदयविकाराचे बळी ठरल्याचेही या आकडेवारीतून उघडकीस आले आहे.
शहरात हृदयविकाराच्या बळींची संख्या सर्वाधिक असून, त्यापाठोपाठ गंभीर आजारात क्षयरोग आणि विविध प्रकारच्या कर्करोगाचा क्रमांक लागतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरात दरदिवशी विविध आजाराने ९२ जणांचा मृत्यू होतो. त्यापैकी ३३ जण हृदयविकाराचे बळी ठरतात. त्यापाठोपाठ क्षयरोगाच्या बळींची नोंद होते. या आजारपणात दरदिवशी २२ मुंबईकरांना प्राण गमवावा लागतो, तर १४ लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो. गेल्या १४ वर्षांत क्षयरोग आणि कर्करोगाने मृत्यू झालेल्या मुंबईकरांची संख्या अनुक्रमे १.१३ लाख आणि ७२,७५९ अशी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) निष्कर्षानुसार, दर तीन मिनिटांनी दोघा भारतीयांचा क्षयरोगाने मृत्यू होतो. संघटनेच्या २0१३ च्या सर्वेक्षणानुसार जगात सर्वाधिक क्षयरोगी (टीबी पेशंट) भारतात आहेत. देशभर क्षयरोग तर मुंबई शहरात हृदयविकाराचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे.