कुर्ला-अंधेरी रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2014

कुर्ला-अंधेरी रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको

कमानी जंक्शन ते साकीनाका जंक्शनपर्यंतचा कुर्ला-अंधेरी रोड रुंदीकरणासाठी व महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी बुधवारी जरीमरी येथे मनसेच्या वतीने 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.

कमानी ते साकीनाका जंक्शनपर्यंतचा कुर्ला-अंधेरी रोड, अंधेरी तसेच विद्याविहारला जोडणारा वाहतुकीचा एकमेव अरुंद रस्ता आहे. या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असून दुतर्फा केलेल्या अनधिकृत गाडी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ठरलेली आहे. नेहमीच होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. त्याचप्रमाणे अत्यवस्थ रुग्णास घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिका तसेच गरोदर महिलांचा जीव या वाहतूक कोंडीमुळे धोक्यात आला आहे. मुंबईत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ता रुंदीकरण त्याचप्रमाणे उड्डाणपूल आदी उपाययोजना केल्या जातात. पालिकेने अनेक वेळा आराखडे व अंदाजपत्रक तयार करूनही गेल्या अनेक वर्षांपासून कुर्ला रोडचे रुंदीकरणाचे प्रकरण प्रलंबित आहे. हा रस्ता रुंदीकरणासाठी मनसे प्रभाग क्र. १५४ चे नगरसेवक व विभाग अध्यक्ष दिलीप लांडे यांनी पालिकेसोबत वारंवार पत्र व्यवहार केला होता. मात्र काहीही ठोस कारवाई न केल्या कारणाने हे आंदोलन केले असल्याचे लांडे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलीप लांडे व मनसेच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व थोड्या वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.

Post Bottom Ad