मुंबई, (प्रतिनिधी): भायखळा येथील महानगर पालिकेच्या जिजामाता उद्यानात असलेल्या भाऊ दाजी लाड वस्तू सनग्रालयाचा भूखंड गिळंकृत करण्याच्या हालचाली बजाज फाऊशनने चालवल्या आहेत . त्यासाठी आयुक्तांनी सभागृहाची परवानगी न घेता बजाजला १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सभागृहाची दिशाभूल करणारा असून १०० कोटी रुपये देन्याबाबत आयुक्तांनी खुलासा करावा अशी जोरदार मागणी केली. यावेळी सभाग्रहात येण्यास आयुक्तांनी नकार दिल्याने सर्व पक्षीय सदस्यांनी आक्रमक भूमिका घेवून सभागृह तहकुब करण्याची मागणी केली. यावर महापौर स्नेहल आंबेरकर यांनी सभा तहकूब केली .
राणी बागेतील भाऊ दाजी लाड वस्तू संग्रालयाला जोडून असलेल्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कला दालन उभारण्यात येणार आहे. न्युयोर्कचे स्टीवन हॉल यांच्या संकल्प चित्राची निवड करण्यात आली आहे . त्यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यातील १०० कोटींचा खर्च महानगर पालिका करणार असल्याचा निर्णय आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम राजकीय सभा आणि मुलांना खेळण्याचे मैदान हडप करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे हा अधिकार त्यांना कुणी दिला असा सवाल निवेदना द्वारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी उपस्थित करून निषेध व्यक्त केला. ह्या निवेदनाचे सर्व पक्षीय सदस्यांनी समर्थन केले . सध्या उद्यानाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे , पाण्याची कमतरता आहे . जागोजागी प्लस्त्तिक्चा खच पडला आहे. या समस्या दूर करण्यास पालिकेकडे पैसे नाहीत . अश्यावेळी उद्यानाला १०० कोटी रुपये कसे देऊ शकतात असा सवाल उपस्थित केला . यावर आयुक्तांना बोलावण्याची जोरदार मागणी केली . परन्तु आयुक्तांनी येण्यास नकार दिल्याने सदस्यांनी आक्रमक पवित्रा धारण करून आयुक्तान विरोधात घोषणाबाजी केली. शिवाय सभागृह तहकूब करण्याची मागणी केली . यावर महापौर आंबेरकर यांनी सभागृह तहकूब केले.
पेज ३ साठी आयुक्त
कलादालना साठी २७० जनांची स्पर्धा का घेण्यात आली यासाठी पालिकेची मंजुरी घेतली नाही. त्यामुळे आयुक्त हे फोटो काढण्यासाठीच असल्याची ठरावाची सुचना भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी मांडली. दरम्यान या सुचनेवर बोलताना आयुक्तांच्या अंतर्गत इमारत दुरुस्तीची एक मोठी लॉबी सुरु आहे. आयुक्त , पालिका अधिकारी सामील आहेत असा आरोप गटनेत्यांनी केला. तसेच बजाजला वाढीव जागा देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी म्हटले.