कास्ट्राईब संघटनेची निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2014

कास्ट्राईब संघटनेची निदर्शने

मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
केंद्र सरकारच्या 'रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयक २0१४'च्या विरोधात कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. तसेच राज्यभरही संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. 


सरकारच्या मनमानी कारभारामुळे टप्पे वाहतुकीला मोकळे रान मिळणार आहे. सरकारच्या या नव्या धोरणामुळे एसटी वाहतूक बंद करावी लागेल, अशी भीती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी या वेळी व्यक्त केली. संघटनेच्या वतीने एकाच वेळी राज्यभर आंदोलन करण्यात आले. यापूर्वी सरकारला वेळोवेळी निवेदने देण्यात आली. मात्र, सरकारने मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. आता संघटना शांत बसणार नाही. सरकारचा हा कुटील डाव आम्ही हाणून पाडणारच, असा इशारा निरभवणे यांनी या वेळी दिला. 

हा कायदा झाला तर पंचायत पातळीवर परमिट राज सुरू होईल व त्याचा फटका एसटी वाहतुकीला बसेल. कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सरकारने या कायद्याचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. याचबरोबर मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय रद्द करावा व मागासवर्गीयांना शासकीय, निमशासकीय सेवेत बढती नाकारणारा मॅटचा निर्णय रद्द करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी शशिकांत निकाळजे, आनंद हेलगावकर, गौतम कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad