राजपत्र उपलब्ध होणार आता ई-गॅझेट स्वरूपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2014

राजपत्र उपलब्ध होणार आता ई-गॅझेट स्वरूपात

मुंबई : महाराष्ट्र शासनाचे राजपत्र आता इंटरनेटवर ई-गॅझेट स्वरूपात उपलब्ध होणार आहे. संगणक तसेच इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दोन विभागात प्रकाशित करण्यात येत असते. असाधारण व सर्वसाधारण राजपत्राच्या प्रती या लोकप्रतिनिधी, न्यायालये, शासकीय कार्यालये व व्यक्ती तथा संस्थांना देण्यात येत असतात. या मेलिंग लिस्टमध्ये साडेचार हजार कार्यालये व खासगी संस्थांचा समावेश आहे. केंद्र सरकार व इतर राज्यांची राजपत्रे ई-गॅझेट स्वरूपात उपलब्ध आहेत. संगणक व इंटरनेटचा वापर लक्षात घेता महाराष्ट्र शासनाचीही राजपत्र ई-गॅझेट स्वरूपात इंटरनेटवर उपलब्ध होतील. डीजीपीएस.महाराष्ट्र.जीओव्ही या संकेतस्थळावर ती उपलब्ध होतील. राजपत्र पाठवण्याची प्रचलित पद्धत ३१ जानेवारी २0१५ पर्यंतच सुरू राहणार आहे. इंटरनेटवर ती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने श्रम व धावपळ वाचणार असून मिळण्यात सुलभता येणार आहे.

Post Bottom Ad