मुंबई ( जेपीएन न्यूज ): भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार ऍड आशिष शेलार अध्यक्ष असलेल्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे देण्यात येणारे यावर्षीचा महमद रफी जीवन गौरव पुरस्कार 2014 ज्येष्ठ गायिका अाशा भोसले यांना आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना महमद रफी पुरस्कार दि.24 डिसेंबर रोजी देण्यात येणार आहेत.
जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख ;मानचिन्ह आणि रफी पुरस्कार एकावन्न हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्रीय माहिती प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते बांद्रयाच्या रंगशारदामध्ये शानदार सोहळयात या पुस्काराचे वितरण होणार आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गायक महमद रफी यांच्या90 व्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी स्पंदन संस्थेतर्फे महमद रफी यांच्यासोबत त्याकाळत काम केलेल्या संगित क्षेत्रातील एका गायक आणि संगितकाराला महमद रफी पुरस्काराने गौरविण्यात येते. रफी यांचे कुटुंबीय आमदार ऍड आशिष शेलार यांच्या बांद्रा विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यामुळेच त्यांच्या सन्मानार्थ गेली सहा वर्षे स्पंदन या संस्थेतर्फे यापुरस्कारसंध्येचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे हे 7 वे वर्ष असून यापुर्वी ज्येष्ठ गायिका शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, ख्य्याम या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी, यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
24 डिसेंबर संध्याकाळी सहा वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणाऱया या कार्यक्रमात सुरूवातीला प्रसाद महाडकर यांच्या जीवन गाणी तर्फे फिर रफी हा महमद रफी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. श्रीकांत नारायण आणि सरिता राजेश हे महमद रफी यांची गाणी सादर करतील तर कार्यक्रमाचे निवेदन संदिप कोकीळ करणार आहेत. त्यानंतर कार्यक्रमाच्या आमदार आशिष् शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मध्यांतरात होणाऱया कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. यावेळी महमद रफी यांचे कुटुंबीय ही उपस्थितीत राहणार आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असणार आहे.