शीत शव पेट्यांचा ठराव मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2014

शीत शव पेट्यांचा ठराव मंजूर

मुंबई ( जेपीएन न्यूज ): मुंबईकरांना नातेवाईकांचे मृतदेह मुंबईबाहेर अथवा गावी नेण्याचे झाल्यास किंवा शवविच्छेदन केलेला मृतदेह काही तास घरीच ठेवायचा असेल पालिकेने प्रमुख रुग्णालयात शीत पेट्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सुचनेला सर्व पक्षिय नगरसेवकांनी एकमताने सहमती दर्शवल्याने सभागृहात मंजूरी मिळाली आहे. याबाबत आता पालिका आयुक्तांकडून सकारात्मक अभिप्राय मिळल्याची गरज आहे. आयुक्तांकडून शीतपेट्यांना हिरवा कंदील मिळाल्यास प्रत्येक रुग्णालयात शीत पेट्या माफक दरात उपलब्ध होणार आहेत.

Post Bottom Ad