महापरिनिर्वाण दिनानिमित्त मरेची एलटीटी-सोलापूर स्पेशल ट्रेन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2014

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मरेची एलटीटी-सोलापूर स्पेशल ट्रेन

मुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणार्‍या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर स्थानकांदरम्यान एक स्पेशल अनारक्षित ट्रेन चालवण्यात येणार आहे.
त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 0१0८७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर स्पेशल अनारक्षित ट्रेन ६ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ५0 मिनिटांनी सुटणार असून सोलापूरला सकाळी १0 वाजून ३0 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 0१0८८ सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल अनारक्षित ट्रेन ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ३0 मिनिटांनी सुटणार असून लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचणार आहे. या स्पेशल ट्रेनला कल्याण, लोणावळा आणि पुणे या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. तसेच या ट्रेनला जनरल सेकंड क्लासचे १९ कोच असणार आहेत. प्रवाशांनी या अनारक्षित ट्रेनचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad