एकलव्य अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष - ५ विद्यार्थी जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2014

एकलव्य अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष - ५ विद्यार्थी जखमी

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये सुरु केलेल्या एकलव्य अभ्यासिकेत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणाचीही पालिका प्रशासनाने नियुक्तीच केली नसल्याने घाटकोपरच्या रमाबाई नगर शाळा क्रमांक १ मधील ५ विद्यार्थी आग लागून जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. 

घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगर शाळेमध्ये २७ नोव्हेंबर पासून एकलव्य अभ्यासिका सुरु केली होती. या ठिकाणी सायंकाळी ६.३०  रात्री १० वाजे पर्यंत  अभ्यासिका चालवली जात होती. सदर अभ्यासिका चालवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर देखरेख करण्यासाठी कोणताही शिक्षक नव्हता. अभ्यासिकेला दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये लाईट नसल्याने विद्यार्थ्यांनी दिवा लावण्याचा प्रयत्न केला असता प्रयोगशाळेमध्ये असलेल्या रसायनांना आग लागून ५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये प्रथमेश खिल्लारे, संदीप जाधव, विशाल सूर्यवंशी, प्रफुल्ल भोजने व रोशन मलिक हे ५ विद्यार्थी आगी मध्ये होरपळले आहेत. या पैकी प्रथमेश खिल्लारे, संदीप जाधव, विशाल सूर्यवंशी, प्रफुल्ल भोजने या चार विद्यार्थ्यांवर पालिकेच्या केइएम रुग्णालयात तर रोशन मलिक याच्यावर याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

याबाबत नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पालिका सभागृहात हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रयोग शाळेत अभ्यासिका का चालवली गेली, विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यास शिक्षक का नव्हते असे प्रश्न उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली. याबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या विद्यार्थ्यांच्या औषध उपचाराचा खर्च पालिका उचलणार असून चौकशीचा अहवाल येई पर्यंत छेडा यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे. 

Post Bottom Ad