नागपूर / मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
मुंबईच्या दहिसर येथील गणपत पाटील नगर शेजारील तिवरांचे वन संरक्षीत करून त्या जागी तिवरांचे पार्क साकारण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिली.
दहिसरच्या गणपत पाटील नगरमधील झोपडपट्टी दिसेवन दिवस वाढत असून त्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत तर तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात येत आहे याकडे लक्षवेधीत भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता त्यावर उपप्रश्न विचारताना भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी येथे झोपडपट्टी वाढत आहेत आणि तिवरांची कत्तल होत आहे मग सरकारकडून संरक्षीत भित बांध्ण्यात येईल काय त्यावर उत्तर देताना भिंत बाधणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणविस यांनी सांगितले . मग उर्वरीत भाग कांदळवणाचा भाग संरक्षीत करून ते संरक्षीत वन म्हणून जाहीर करणार काय असा प्रश्न आमदार शेलार केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कांदळवणचे संरक्षीत वन जाहीर करण्यात येईल असे सांगितले