मुंबईच्या विकास आराखड्याबाबत तीन समित्या स्थापन करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2014

मुंबईच्या विकास आराखड्याबाबत तीन समित्या स्थापन करण्याची मागणी

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेकडून नवीन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या विकास आराखड्या संदर्भात सुचाना व हरकतीवर सुनवाई घेण्यासाठी एकाच समिती स्थापन करण्यात येणार आहे. मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहर, पूर्व उपनगरे तसेच पश्चिम उपनगरे अश्या तीन समित्या स्थापन करून सुनवाई घेण्यात यावी अशी ठरावाची सूचना समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी पालिकेकडे सादर केली आहे. 

नवीन विकास आराखड्याला महानगर पालिकेची मान्यता मिळाल्यानंतर जनतेकडून सूचना हरकती वर सुनवाई घेण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत नियोजन समितीकडे विचारार्थ व अहवालासाठी पाठविण्यात येणार आहे. मुंबई शहराची लोकसंख्या सतत वाढत असल्याने या शहरासाठी एकच नियोजन समिती पुरेशी होणार नाही. त्यामुळे मुंबई शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे अश्या तीन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात येता याव्यात यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व रचनाकार अधिनियम १९६६ मध्ये दुरुस्ती करण्यात यावी. जेणे करून प्राप्त झालेल्या सूचना व हरकतीचा परामर्श घेवून नवीन विकास आराखडा लवकरात लवकर राबवता यावा म्हणून महापौरांनी शासनाकडे तसे निवेदन सादर करावे अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे. 

Post Bottom Ad