केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्रालयाने इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यास मान्यता दिली असून राज्य सरकार त्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदी तातडीने पूर्ण करेल व बाबासाहेबांच्या जयंतीला म्हणज्े येत्या १४ एप्रिल रोजी त्याची पायाभरणी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पोलीस पथकाद्वारे शासकीय मानवंदना देऊन चैत्यस्तूपावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे समतेचा व बंधुभावनेचा संदेश देशाला दिला. आज याप्रसंगी आपण सर्वांनी समतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन त्यांनी केले.
दरवर्षी प्रमाणे यंदाही भीमसैिनकांना आठआठ तास वंदन रांगेत उभे राहावे लागले. दुपार झाली तरी तेव्हा वंदन रांग वरळी सीफेस पर्यंत कायम होती. यंदा पािलकेने संपूर्ण िशवाजी पार्कवर मॅट टाकली होती. त्यामुळे धुळीचा त्रास झाला नाही.
आज सकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महापौर स्नेहल आंबेकर, सामािजक न्यायमंत्री िदलीप कांबळे, महिला बालकल्याण मंत्री िवद्या ठाकुर, मंत्री एकनाथ गायकवाड तसेच छगन भुजबळ,मािणकराव ठाकरे, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर, हुसेन दलवाई, उप महापौर अलका केरकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आदींनी बाबासाहेबांना वंदन केले.
ठाकरेंचे शक्तीस्थळ झाकले
चैत्यभूमीच्या शेजारील िशवाजी पार्कवर िदवंगत िशवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची समाधीस्थळ आहे. ते महापारीनिर्वान दिनाच्या आधीपासून ताडपत्र्यांनी बंद करण्यात आले आहे.
संिवधानला मागणी
िशवाजी पार्कवर पुस्तकांचे पाचशे स्टाॅल होते. त्यावर चौकशी केली असता "भारतीय संविधान', "बुद्ध आिण त्याचा धम्म' आिण "शूद्र मूळचे कोण होते' या पुस्तकांची िवक्री तडाखेवंद झाल्याची माहिती िमळाली.
समता सैिनकांचा पहारा
राज्याच्या िवविध भागातील १२०० समता सैिनक तीन िदवस व्यवस्थेसाठी आहेत. तसेच बृहन्मुंबई पालिकेचे ४०० स्वच्छता कर्मचारी तीन पाळ्यात काम करत आहेत.
फ्लेक्स गायब
मागची दोन वर्षे लोकसभा आिण िवधानसभा िनवडणुकांची धामधूम होती. त्यामुळे महापरिनिर्वाण िदनाला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या फ्लेक्सची गर्दी असायची. यावेळी मात्र न्यायालयाचा आदेश असल्याने आंबेडकर संघटना वगळता इतरांचे अभिवादन करणारे फ्लेक्स नसल्याचे जाणवले.
दिशादर्शक फुगा
महापरिनिर्वाण िदनाला दादर परिसरात अलोट जनसागर उसळतो.त्यात अनेकजणांची चुकामुक होते. अनेकांना िशवाजी पार्क सापडत नाही. त्यावर उपाय म्हणून रिपब्लिकन सॆनेने हवेत दिशादर्शक फुगे सोडण्याची मागणी केली होती हि मागणी मान्य करत महापािलकेने िशवाजी पार्कच्या आकाशत बाबासाहेबांचे प्रतिमा असलेला दिशादर्शक भव्य फुगा सोडला होता.