सागरीकिनार्‍यांच्या सुरक्षेसाठी कोस्टल हेल्पलाइन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2014

सागरीकिनार्‍यांच्या सुरक्षेसाठी कोस्टल हेल्पलाइन

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : 
सागरी किनार्‍यांवर संशयित हालचाली दिसल्यास जनतेकडून पोलिसांना तत्काळ माहिती कळवण्यासाठी कोस्टल हेल्पलाइन १0९३ या नि:शुल्क सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.


सागरी किनारे सुरक्षित करण्यासाठी सागरी पोलीस ठाणी, स्पीड बोटींतून गस्ती पथके सागरी पोलिसांसह सागरी किनार्‍यांच्या सुरक्षेत गुंतली आहेत. तरीदेखील समुद्र किनारी अथवा परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांना तत्काळ पोलिसांना माहिती देण्याच्या हेतूने कोस्टल हेल्पलाइन १0९३ ही नि:शुल्क सेवा सुरू करण्यात आली आहे. समुद्रामध्ये एका वेळेस शेकडो मच्छीमारी बोटी असतात. त्यावर अनेक कोळी बांधव व इतर लोक समुद्रात असतात. त्यांना समुद्र हद्दीत आलेली अनोळखी बोट आल्यास किंवा संशयित व्यक्ती दिसल्यास ते हेल्पलाइनवरून पोलिसांशी संपर्क साधू शकतात. या हेल्पलाइनचे समुद्रकिनारी असलेल्या वस्त्यांमधील रहिवाशांना देखील मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Post Bottom Ad