मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
मेल-एक्स्प्रेसचे तिकीटाप्रमाणे आता मुंबईतील लोकल ट्रेनच्या तिकिटांचाही परतावा प्रवाशांना मिळणार आहे. मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी आर वॉलेट ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्याची आवश्यकता असून "गुगल प्ले स्टोअर‘वर ते आहे. मोबाईलवरून तिकीट काढल्यावर ते रद्द केल्यास याद्वारे परतावा मिळू शकेल. मात्र तिकीट मोबाईलद्वारे मिळत असले तरी परतावा घेण्यासाठी रांगेतच उभे राहावे लागेल.
मोबाईलवरून तिकीट काढण्यासाठी आर वॉलेट डाऊनलोड केल्यावर त्यात मोबाईलप्रमाणे आधी पैसे जमा करावे लागतील. तिकीट काढल्यानंतर त्यातून तिकिटाची रक्कम परस्पर वळती होईल. शनिवारी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मोबाईलद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.