मुंबई ( जेपीएन न्यूज ): शहरात महिलांवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांना आळा घालण्याच्या मोहिमेंतर्गत मुंबई पोलिसांनी आता व्हिडीओ पार्लरविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा व्हिडीओ पार्लरविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मागील आठवडाभरात विविध ठिकाणी छापा टाकून 'ब्ल्यू फिल्म' दाखवणार्या डझनभर लोकांना अटक केली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर व उपनगरातील व्हिडीओ पार्लरविरोधात हे धाडसत्र सुरू आहे. एका पोलीस अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, सर्वात जास्त धाडी मालाड परिसरात टाकण्यात आल्या. या परिसरात ६ ठिकाणी कारवाई करण्यात आली. अनेकदा अशा ब्ल्यू फिल्म घराचे दरवाजे तसेच एलसीडीवर दाखवली जात असल्याचे कारवाईदरम्यान उघडकीस आले आहे.