जानेवारीपर्यंत सीएसटी स्थानकात वायफाय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2014

जानेवारीपर्यंत सीएसटी स्थानकात वायफाय

मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करत असताना लोकल कधी येणार याची अचूक माहिती आता रेल्वे प्रवाशांना मिळू शकणार आहे. वायफाय तंत्रज्ञानाच्या आधारे उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना लोकलची माहिती मिळू शकणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये या आधी हा प्रयोग यशस्वी झाला असून, आता मध्य रेल्वेमध्ये वायफाय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यानुसार येत्या जानेवारी महिन्यात सीएसटी स्थानकात वायफायची सोय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

प्रवाशांना अगदी कमी किमतीमध्ये वायफाय सेवा पुरविण्यात येणार आहे. एका मोबाइल कंपनीने उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना वायफाय सेवा पुरवण्यासाठी मध्य रेल्वेला एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावातून महसूल कसा मिळू शकतो, याचा अभ्यास केला जाणार आहे. देशातील ए-१ रेल्वे स्थानकांचा दर्जा असलेल्या ७५ रेल्वे स्थानकांवर वायफायची सेवा रेल्वेतर्फे देण्यात येणार आहे. त्यापैकी नवी दिल्ली येथे वायफायची सोय सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर महिनाअखेर आग्रा, अहमदाबाद, वाराणसी या रेल्वे स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर वायफायची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर जानेवारी २0१५ पर्यंत सीएसटी आणि सिंकदराबाद या स्थानकांवरील प्रवाशांना व्हायफायची सेवा मिळणार आहे. विमानतळावरदेखील वायफाय पुरवण्यात येते. त्याच धर्तीवर आता रेल्वे स्थानकांमध्येही वायफाय सेवा देण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रवाशांना लोकलचे अचूक वेळापत्रक मिळण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार वायफाय सेवेसाठी प्रवाशांकडून किती रक्कम आकारली जाणार हे अजून निश्‍चित नसले तरी सामान्य प्रवाशांना परवडेल अशाच दरामध्ये ही सेवा देण्यात येणार आहे. तसेच या सेवेसाठी प्रवाशांनी कशा पद्धतीने रक्कम भरायची आहे हे जरी निश्‍चित करण्यात आले नसले तरी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट क ार्डद्वारे प्रवासी पैसे भरू शकणार आहेत. तसेच प्रवाशांना थ्री जीची सेवाही देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर वायफायची सेवा देण्यासाठी दळणवळण आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने देखील निधीची तरतूद केली आहे.

Post Bottom Ad