महापरिनिर्वाण दिनानिमित्त जादा बसगाड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2014

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जादा बसगाड्या

मुंबई : येत्या शनिवारी ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर आणि उपनगरातील विविध ठिकाणाहून दादर येथील शिवाजी पार्क येथे दर्शनाला येणार्‍या अनुयायांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे.


शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी संध्याकाळपासून बसमार्ग क्रमांक ५३, २४१, ३५१, ३५४ आणि ९२ र्मया. या बसमार्गावर रात्री उशिरापर्यंत ८ जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच शनिवारी ६ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजल्यापासून बसमार्ग क्रमांक २७,५३,६३,९३ र्मया,२४१,३0५,३५७,३५४,३८५,४६३,५0४ र्मया. आणि ५२१ र्मया. या बसमार्गावर एकूण ३0 जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकार्‍यांची तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी पार्क येथून दैनंदिन बसपासांची विक्री करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad