मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पलिकेमधे कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासना कडून योग्य सोयी सुविधा मिळत नसल्याने गेल्या ५ वर्षात १३८६ कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते देवेन्द्र आंबेरकर यांनी केली आहे.
सन २००९ मधे २९९ सन २०१० मधे ३२२ सन २०११ मधे २६४ सन २०१२ मधे २२२ सन २०१३ मधे १८६ तर सन २०१४ मधे आज पर्यन्त ९३ कामगारांचा मृत्यु झाला आहे. पलिकेतील सफाई कामगारांना वैद्यकीय सुविधा व अत्यावश्यक उपकरणे मिळत नाहीत, त्यांची वेळेवर तपासणी होत नाही म्हणून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कामगारांचा सेवेत असताना मधेच मृत्यु झाल्याने त्याना नियमानुसार घर सुद्धा मिळत नाही यामुळे या कामगारांकडे पालिकेने विशेष लक्ष देण्याची मागणी आंबेरकर यांनी केली आहे