मुंबई ( जेपीएन न्यूज ) : गुजरातमध्ये परप्रांतियांना पळवुन लावा अशी एक प्रकारे मोहिम सुरु करण्यात आली असुन याचा फटका मराठी व्यापाऱ्याना बसत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. मुळच्यासाताऱ्यात राहणाऱ्या फडतरे दापम्पत्याला मारहाण करुन गोध्रामधुन हाकलुन देण्यात आले असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे.
महाराष्ट्रामध्ये गुजराती व्यापाऱ्याना अनेक सुविधा देण्यात येत आहे मात्र गुजरामध्ये याउलट परीस्थिती आहे. गुजरातमध्ये आपले व्यापार सोडुन जाण्यासाठी धमकी देण्यात येत असल्याचे आरोप शशिकांत फडतरे यांनी केले.
मराठी व्यापाऱ्याच्या कुंटुंबावर प्रांतवादातून होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फडतरे यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परीषद आयोजित केली होती. फडतरे हे मुळचे सातारामधील खटाव तालुक्यामध्ये राहणारे आहेत. गुजरात राज्यात गोधरा येथे ते ४ ते ५ वषार्पासुन दुकान चालवतात. सोने-चांदी वितळविण्याचा काम या दुकानांमध्ये चालतो.
गुजरातमधील सोनी समाजातील नागरीकांकडुन त्यांना शुल्लक कारणावरुन मारहाण करण्यात आली त्याचप्रमाणे त्यांच्यावर खोटी केस गोधरा टाऊन पोलिस स्थानकांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्या इतर मराठी व्यापाऱ्याना देखील भितीखाली काम करावे लागत असल्याचे शशिकांत फडतरे यांनी यावेळी सांगितले.