मुंबई ( जेपीएन न्यूज ): मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षण केल्यास त्याची सद्यस्थिती मोबाईलवर दिली जाणार असून ही सेवा लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून सुरू केली जाणार आहे. असे असतानाच येत्या महिनाभरात उपनगरीय लोकलचे तिकीट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी महिनाभरात सेवा सुरू करण्यात येणार असे म्हटले असले तरी दोन वर्षे उलटून गेली तरी त्यावर विचारच सुरू असल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण केल्यावर त्याची सद्यस्थिती प्रवाशाला रेल्वेच्या वेबसाईटवर पाहावयास मिळते. यासाठी संगणक सुरू करा, त्यानंतर रेल्वेच्या (आयआरसीटीसी) वेबसाईटवर जाऊन ते पहा, यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे या पर्याय म्हणून 'एसएमएस अलर्ट' अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशाने आरक्षण फॉर्मवर असलेल्या मोबाईल नंबरच्या कॉलममध्ये आपला मोबाईल नंबर दिल्यास ही सेवा त्या प्रवाशाला मिळेल. प्रवाशाचे तिकीट ज्या तारखेचे असेल, त्याच्या पाच दिवस अगोदर असा प्रत्येक दिवशी एक एसएमएस प्रवाशांच्या मोबाईलवर रेल्वेकडून येईल. या एसएमएसमधून तिकीट आरक्षणाची सद्यस्थिती दिली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला जात असतानाच ७५ लाख प्रवासी असलेल्या मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांचे अशाच प्रकारच्या तिकीट सुविधेकडे लक्ष लागले आहे.
उपनगरीय लोकलचे तिकीट मोबाईलद्वारे बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या आयआरसीटीसीमार्फत अशी पास सेवा असली तरी त्यामध्ये अधिक शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येते. मोबाईलवर लोकलचे तिकीट बुक केल्यास प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका होऊ शकते. रेल्वेमंत्र्यानी ही सेवा येत्या महिनाभरात सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले असले तरी ही सेवा देताना अनेक तांत्रिक अडचणी असून त्यामुळे आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात येते.