मुंबई ( जेपीएन न्यूज ) : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठय़ा प्रमाणात चौपाट्यावर गर्दी करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने ३१ डिसेंबरच्या रात्री जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
बुधवार, ३१ डिसेंबर रोजी रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्रकिनार्यांवर-चौपाट्यांवर फिरावयास जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग क्रमांक १ र्मया., ७ र्मया., ११२,२0३, २३१,२४७ आणि २९४ या बसमार्गावर रात्री ११ पासून एकूण १४ जादा बसेस चालवण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) आणि सीएसटी या ठिकाणी वाहतूक अधिकारी, बस निरीक्षक ांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.