लोकलमधील भजनी मंडळींना रेल्वे पोलिसांचा दणका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2014

लोकलमधील भजनी मंडळींना रेल्वे पोलिसांचा दणका

मुंबई - हार्बर रेल्वेवर वाशी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकांदरम्यान लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यातील भजनी मंडळींना रेल्वे पोलिसांनी दणका दिला आहे. या भजनी मंडळींबाबत अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी 22 जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. आणखी चार दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. भजनी मंडळाच्या नावाखाली जागा अडवली जाते. अन्य प्रवाशांना बसू दिले जात नाही. कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ या मार्गावर भजनी मंडळांचे स्वयंघोषित आरक्षण असते. या डब्यात अन्य प्रवासी चढल्यास त्यांना उभे राहावे लागते. पश्‍चिम रेल्वेत असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

Post Bottom Ad