मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
मेट्रोतून प्रवास करणार्या मुंबईकरांना मेट्रो प्राधिकरणाने नववर्षाची आनंदवार्ता दिली आहे. आता प्रवाशांना स्मार्ट कार्डचे रिचार्ज इंटरनेट आणि मोबाइलवरून करण्याची सुविधा होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अव्वल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेसहित इतर ५0 बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून स्मार्ट कार्ड रिचार्ज करता येऊ शकते. या नव्या सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच या सेवेद्वारे प्रवासी रिचार्ज रकमेबाबत माहिती प्राप्त करू शकतात.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर पहिली मेट्रो जून महिन्यात धावू लागली होती. वेळ आणि प्रवाशांची दगदग कमी होत असल्यामुळे सहा महिन्यांत मेट्रो प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. अंधेरी, मरोळ आणि साकीनाका स्थानकात उतरणार्या प्रवाशांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. स्मार्ट कार्ड वापरणार्या प्रवाशांचा यामध्ये भरणा अधिक असल्याचे आढळून आले होते. मात्र स्मार्ट कार्ड रिफिलिंग करण्यास बराच विलंब लागत असल्याने मेट्रो प्राधिकरणाने इंटरनेट आणि मोबाइलद्वारे स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्मार्ट कार्ड रिचार्ज यशस्वी झाल्यानंतर एकेरी प्रवासासाठी ही सुिवधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मेट्रो प्राधिकरणाने म्हटले आहे.
रिचार्ज कसे कराल?
स्मार्ट रिचार्जसाठी http://www. reliancemumbaimetro.com हे संकेतस्थळ उघडावे. त्यावरील माय अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर इन्स्टाचार्जवर क्लिक करावे. स्मार्ट कार्डच्या मागील बाजूस असलेला सीएसएसी नंबर इन्स्टाचार्जवर टाईप करावा. गरजेनुसार प्रवाशांनी स्मार्ट कार्ड रिचार्ज करावे. नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून शुल्क भरावे. सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन तासांचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर टीआयएम मशीनमध्ये प्रवाशांनी स्मार्ट कार्ड इन्सर्ट केल्यावर शुल्लक रकमेची माहिती उपलब्ध होईल. मोबाइलवर या सर्व प्रक्रियेची पावती प्रवाशांना प्राप्त होईल.
मेट्रोतून प्रवास करणार्या मुंबईकरांना मेट्रो प्राधिकरणाने नववर्षाची आनंदवार्ता दिली आहे. आता प्रवाशांना स्मार्ट कार्डचे रिचार्ज इंटरनेट आणि मोबाइलवरून करण्याची सुविधा होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अव्वल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेसहित इतर ५0 बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून स्मार्ट कार्ड रिचार्ज करता येऊ शकते. या नव्या सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच या सेवेद्वारे प्रवासी रिचार्ज रकमेबाबत माहिती प्राप्त करू शकतात.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर पहिली मेट्रो जून महिन्यात धावू लागली होती. वेळ आणि प्रवाशांची दगदग कमी होत असल्यामुळे सहा महिन्यांत मेट्रो प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. अंधेरी, मरोळ आणि साकीनाका स्थानकात उतरणार्या प्रवाशांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. स्मार्ट कार्ड वापरणार्या प्रवाशांचा यामध्ये भरणा अधिक असल्याचे आढळून आले होते. मात्र स्मार्ट कार्ड रिफिलिंग करण्यास बराच विलंब लागत असल्याने मेट्रो प्राधिकरणाने इंटरनेट आणि मोबाइलद्वारे स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्मार्ट कार्ड रिचार्ज यशस्वी झाल्यानंतर एकेरी प्रवासासाठी ही सुिवधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मेट्रो प्राधिकरणाने म्हटले आहे.
रिचार्ज कसे कराल?
स्मार्ट रिचार्जसाठी http://www.