मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगर पालिकेच्या उपनगरातील हॉस्पिटल्स मधील डॉक्टरांच्या कामाच्या अतितणावामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या हॉस्पिटल्स मध्ये असलेली रिक्त पदे, सोळा तासांच्या ड्युट्या, पेशंटची वाढती संख्या , रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणारी मारहाण आणि बदल्यांचा अभाव या सर्वाचा ताण डॉक्टरांच्या आरोग्यावर पडत आहे. त्यामुळे त्यांना डायबेटीस, मानसिक ताण , ब्लड प्रेशर , हृदयविकार असे विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे.
मुंबई उपनगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या मुंबईत १८ पेक्षा अधिक हॉस्पिटल्स , १६२ पेक्षा अधिक दवाखाने व १८ पेक्षा अधिक प्रसुतीगृहे आहेत. त्यमध्यॆ २०० वैद्यकीय अधिकार्यांच्या जागा आहेत. त्यातील १५० पेक्षा अधिक जास्त वैद्यकीय अधिकारी वर्षानुवर्षे येथे काम करत आहेत. तर तज्ञ निवासी डॉक्टरांची ६२० मंजूर पदे आहेत. पण सुमारे सध्या २०० निवासी डॉक्टरांची पदे रिक्त आहेत . त्यामुळे डॉक्टरांवर अति ताण पडत असून त्यांना १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनाच विविध आजारांनी ग्रासले आहे. `अनेक डॉक्टर्स वर्षानुवर्षे उपनगरातील हॉस्पिटल्स मध्ये काम करतात , त्यांचे वय जास्त झाले असूनही त्यांना रात्र पाळी करावी लागत असून कधी कधी सोळा तास काम करावे लागत आहे. तर तरुण मुलांना डीस्पेन्सरीमध्ये वर्षानुवर्षे ठेवले जात आहे . यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे असोसिएशन ऑफ सिव्हिक मेडिकोजचे जनरल सेक्रेटरी डॉ. संजयकुमार डोळस यांनी सांगितले. तसेच या अतिकामाच्या तणावामुळे डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
उपनगरातील हॉस्पिटलमधील ओपीडीमध्ये दररोज एक डॉक्टरकिमान ८० ते १०० पेशंट तपासतो .त्यामुळे प्रत्येक पेशंटकडे लक्ष देण्यास वेळ पुरत नाही. गंभीर आजार असलेला पेशंट कधी कधी दगावतो . पण पेशंटचे नाते वाईक संतप्त संतप्त होऊन डॉक्टरलाच मारहाण करतात . त्यामुळे डॉक्टर सतत तणावाखाली असतात. या स्वरूपाच्या कामामुळे येथील डॉक्टरांना दरमहा दहा हजार रुपये हायरीस्क अलाउन्स देण्याची मागणी केली होती. त्यावर हायरिस्क अलाउन्स देण्या एवजी तीन वर्षे सेवा झाल्यावर डॉक्टरांना दवाखान्यात बदली देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण, तरीही बदल्या होत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे .