मुंबई ( जेपीएन न्यूज ) : दिवसा गर्मी आणि रात्री थंडी असा काही मुंबईतील हवामानाचा सध्या मूड आहे. मात्र, या विषम तापमानाचा परिणाम मुंबईकरांच्या स्वास्थ्यावर होत आहे. यामुळे घसा, कोरडी त्वचा आणि इतर आजार वाढण्याच्या मार्गावर आहे.
मलेरिया, डेंग्यू आणि इतर साथीच्या आजारांमुळे मुंबई महानगरपालिकेची झोप उडाली होती. मलेरियामुळे जवळपास १५ मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. मात्र पारा घसरताच साथीच्या आजारास एकप्रकारे लगाम घातला गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात तापाचे ८५६६ (१२९२ ने वाढ), मलेरियाचे ८३१ (६३ ने वाढ), डेंग्यूचे १४६ रुग्ण (५0 ने वाढ) आणि टायफॉईडचे १२७ रुग्ण (२४ ने वाढ) आढळून आले आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांशी तुलना केल्यास नोव्हेंबर महिन्यात रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र सध्या कायम असलेल्या विचित्र हवामानाचा फटका पुन्हा मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे. घश्याची समस्या, कोरडी त्वचा, फ्ल्यू, दमा यासारख्या समस्यांनी सध्या मुंबईकर त्रस्त आहे.
सध्या लग्न समारंभांचा हंगाम सुरू आहे. या काळात थंड पदार्थ जसे शीतपेये, आईसस्क्रीम खाण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळेच घशाचा त्रास वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच बदलत्या हंगामाशी अनुकूल होण्यास काही जणांना वेळ लागतो. त्यामुळेच खोकला आणि दम्याचे विकार वाढत आहे.