मुंबई : परिवहन शुल्काच्या नावाखाली मुंबईकरांची लुटमार होत असताना आता वीज बिलासोबत अनामत रकमेच्या नावाखाली वीज ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यास बेस्ट प्रशासनाने सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ३५ क ोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही रक्कम भरली नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी धमकी देणारी नोटीसच वीज ग्राहकांना बेस्टने पाठवली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचे आणि असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
बेस्टच्या परिवहन विभागाची तूट भरून काढण्यासाठी मुंबई शहरातील सुमारे १0 लाख वीज ग्राहकांकडून परिवहन शुल्क वसूल करण्यात येते. २0१६ पर्यंत हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. विजेचा वापर न करताही हा भुर्दंड मुंबईकर सहन करीत असताना आता अनामत रकमेच्या नावाखाली महिन्याच्या बिलाइतकी रक्कम मुंबईकरांकडून वसूल केली जात आहे. अनामत रकमेमुळे या महिन्यात वीज ग्राहकांना दुप्पट बिल भरावे लागत आहे.
अनामत रक्कम भरण्यासाठी बेस्टने आपल्या ग्राहकांना नोटीस बजावली असून या नोटीसमध्ये अनामत रक्कम भरण्यासाठी ३0 दिवसांची मुदत दिली आहे. बिल नाही भरले तरी चालेल, परंतु अनामत रक्कम भरावीच लागेल, असा दम ग्राहकांना देण्यात आला आहे. एवढेच नाही तर ही रक्कम भरली नाही तर वीजपुरवठा खंडित केला जाईल अशी धमकीही देण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये म्हणून वीज भरणा केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. बेस्टच्या बसमधून मुंबई शहरातील तसेच ठाणे, नवी मुंबईतील प्रवासीदेखील प्रवास करतात. मात्र बसची तूट फक्त शहरातील वीज ग्राहकांकडूनच वसूल केली जाते.
नवीन ग्राहकांसोबतच जुन्या ग्राहकांकडूनदेखील ही अनामत रक्कम वसूल केली जात आहे. ही मुंबईकरांची लूट आहे.
- रवी राजा, माजी सदस्य, बेस्ट समिती
नियमाप्रमाणे वसूल महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) नियमाप्रमाणे आणि सूचनेनुसार ही अनामत रक्कम वसूल करण्यात येत आहे. वीज ग्राहकाने आपले वीज बिल भरले नाही तर त्याच्या अनामत रक्कमेतून हे बिल वसूल करता येऊ शकते.
- एस. आर. खेडकर, उपमहाव्यवस्थापक, बेस्ट