पाणीपुरवठा व मलनिस्सारण यानगृहातील ३२ वाहने भंगारात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2014

पाणीपुरवठा व मलनिस्सारण यानगृहातील ३२ वाहने भंगारात

मुंबई ( जेपीएन न्यूज )  
महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यानगृहातील ३२ वाहने येत्या ३१ डिसेंबरपासून बंद होणार आहेत. 'पापुमनी' विभागात सध्या कार्यरत असणारे पाण्याचे टँकर्स व ट्रक्स वाहतूक यांचे आठ वर्षांचे आयुष्य या वर्षअखेरीस संपणार आहे. यामुळे पोलिसांच्या नियमानुसार ही ३२ वाहने कायमची बंद होणार आहेत. 


या बंद गाड्यांच्या ऐवजी नवीन गाड्या खरेदी करण्यात आलेली नाहीत. बाद होणार्‍या गाड्यांऐवजी पर्यायी व्यवस्था करणे प्रशासनाने जरुरीचे होते. त्याची जाणीवही कामगारांनी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी करून दिली असताना काहीच उपाययोजना केली नाही, असा आरोप 'महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी केला आहे. 

आता या गाड्या बंद झाल्यावर मुंबईकरांना महापालिका सेवा कशी पुरवणार, या गाड्यांवर काम करणारे वाहनचालक आणि स्वच्छक (क्लिनर) यांच्या हाताला कसे काम मिळणार, एवढय़ा मोठ्य़ा प्रमाणावर गाड्या बंद होत असताना पालिकेचे अधिकारी कसलाही निर्णय का घेत नाहीत, असा सवाल नाईक यांनी केला आहे. पण खाजगीकरण करण्याच्या दिशेने प्रशासनाची पावले पडणार असतील तर याविरोधात आवाज उठवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Post Bottom Ad