एमएमआरडीए बीकेसीसारखी स्मार्ट शहरे उभारणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2014

एमएमआरडीए बीकेसीसारखी स्मार्ट शहरे उभारणार

मुंबई ( जेपीएन न्यूज ): वांद्रे-कुर्ला संकुलाचा कायापालट करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतल्यानंतर आता शहरांतर्गत आणखी स्मार्ट शहरे उभारण्याचा निर्धार एमएमआरडीएने केला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विकास प्रकल्पाची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. 

स्मार्ट शहराची संकल्पना राबवण्यासाठी एमएमआरडीएने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या स्मार्ट शहरांत नागरिकांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संपूर्ण परिसरात वाय फाय सेवा, आठवड्याचे सातही दिवस टेहळणी यंत्रणा यांसारख्या सुविधांनी ही स्मार्ट शहरे सुसज्ज असतात. मार्च, २0१५ पर्यंत वांद्रे-कुर्ला संकुलाचे रूपांतर स्मार्ट शहरात केले जाणार आहे. ही स्मार्ट शहरे व्यावसायिकांना आकर्षित करण्यास सक्षम असल्यामुळे यामुळे रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर, वडाळा यांसारख्या ठिकाणी ही स्मार्ट शहरे उभारण्याची योजना आहे. 'गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेणे हा यामागील उद्देश आहे. तसेच परिसराचा विकास करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हादेखील यामागे मुख्य हेतू आहे,' असे एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Post Bottom Ad