नागपूर / मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
मुंबईतील संक्रमण शिबिरातील रहिवाशी ज्या ठिकाणी गेली वीस वर्षे राहत आहेत त्या ठिकाणीच त्यांना मालकी हक्काचे घर देण्यात यावे अशी मागणी आज विधानसभेत भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली ती गृहनिर्माण् मंत्री प्रकाश महेता यांनी मान्य केली
मुंबईतील अनेक रहिवाशी आपली मूळ इमारत धोकादायक झाल्यामुळे संक्रमण शिबिरात राहत आहेत गेली वीस वर्षाहून अधिक काळ काही रहिवाशी संक्रमण शिबिरात वास्तव्यास असून त्यांना ते सध्या राहत आहेत त्या ठिकाणीच त्यांना मालकी हक्काचे घर देण्यात यावे तसेच ज्या संक्रमण शिबिरात राहत आहेत त्यांचीही अवस्था आता धोकादायक असून त्यांचाही पुर्नर्विकास करण्यात यावा अशी मागणी भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत विचारलेल्या उपप्रशनावर केली त्याला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी ही मागणी मान्य करीत मुंबईतील अशा सर्व संक्रमण शिबिराचा पुर्नविकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले