मुंबई : मायानगरी मुंबई आता भुयारी मार्गांनी जोडण्याची महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारनं आखली आहे. माहिमच्या खाडीपासून बांद्रा-वरळी सीलिंक आणि पुढे नरमिन पॉईंट ही सर्व ठिकाणी भुयारी रिंग रोडच्या साहाय्यानं जोडण्याचा केंद्राचा विचार सुरु असल्याचं गडकरींनी म्हटलं आहे.
मुंबईत इंडियन इन्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्सच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी बोलत होते. बाहेरच्या देशात आपण अशा प्रकारचे रस्ते पाहिले असून त्याची अंमलबजावणी मुंबईत करण्याचा विचार सुरु असल्याचं यावेळी गडकरी म्हणाले.
या प्रकल्पासाठी तब्बल 90 हजार कोटींची खर्च अपेक्षित असून. हा खर्च 60 हजार कोटींपर्यंत आणण्याचे केंद्राचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी गडकरींनी नमूद केलं. त्यामुळं वेगवान म्हणवली जाणारी मुंबई आणखी वेगवान करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं चित्र आहे.