राणीच्या बागेशेजारील कला दालनाला शिवसेनेची मान्यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2014

राणीच्या बागेशेजारील कला दालनाला शिवसेनेची मान्यता


मुंबई ( जेपीएन न्यूज ): भायखळा येथील राणीच्या बागेशेजारील नियोजित कला दालनाला शिवसेनेचा हिरवा कंदील आहे; पण कला दालनासाठी स्थानिक मैदानासह बजाज फाऊंडेशनच्या 'लीझ' कराराला मुदतवाढ देण्यास शिवसेनेचा विरोध आहे, अशी माहिती पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली. 
राणीच्या बागेशेजारील मैदान किंवा क्रीडांगण कला दालनासाठी शिवसेनेचा विरोध असून बजाजचा लीझ करार वाढवून देण्याचा आणि ते उभारणार असलेल्या कला दालनासाठी महापालिकेकडून १00 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव अजून स्थायी समितीसमोर आलेला नाही किंवा पालिकेने फाऊंडेशनला कोणतीही मदत दिलेली नाही, असे फणसे म्हणाले.

राणीची बाग ही जागा हेरिटेज असून तेथे कोणतेही काम करण्यासाठी संबंधितांच्या सर्व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत आणि भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी महापौर असून स्थायी समितीचे अध्यक्ष सचिव आणि आयुक्त, अतिरिक्त आयुक्त सदस्य आहेत. यामुळे ट्रस्टच्या संमतीविना कोणताही प्रस्ताव संमत होणार नाही, असा दावा फणसे यांनी केला.

राणीचा बागेशेजारील मैदान देण्यास मनसेने विरोध केला असून रविवारी मनसेच्या स्थानिक नगरसेविका समिता नाईक व त्यांचे पती संजय यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून कार्यकर्त्यांनी विरोध केला. पण हे मैदान नाही, मोकळी जागा आहे आणि त्याचा वापर गदरुल्ले करतात,' अशा शब्दांत फणसे यांनी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. मुंबईसाठी तयार होत असलेल्या नव्या विकास आराखड्यात (डेव्हलपमेंट प्लॅन) ही मोकळी जागा क्रीडांगण म्हणून आरक्षित करून, असे फणसे म्हणाले.

Post Bottom Ad