प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 December 2014

प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मोर्चा

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित माध्यमांच्या प्राथमिक शिक्षक कर्मचार्‍यांनी शिक्षणाधिकारी आणि प्रशासनाच्या विरोधात हिंदू कॉलनीतील शिक्षणाधिकार्‍यांच्या कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन केले. 


शिक्षण विभागाकडे गेली दोन वर्षे पाठपुरवा करूनही शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्यात आले नाही. तसेच संयुक्त बैठकही घेण्यात आली नाही.शिक्षकांना संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरवणे, अतिरिक्त कर्मचार्‍यांना सामावून न घेणे, त्यांचे वेतन बंद करून नवृत्तीवेतन लाभ न देणे, एकरकमी थकबाकी न देणे, आरटीई प्रमाणे विद्यार्थ्यांचे धोरण न राबवणे, सेवा नवृत्तीचे वेतन व थकबाकी न देणे, कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी मनपाकडे जमा करून न घेणे, मनपा कर्मचार्‍यांप्रमाणे लिपिकांना ग्रेड प न देणे, लिपिक, शिपाई यांच्या रिक्त जागा न भरणे, ३ वर्षे सेवा झालेल्या शिक्षण सेवकांना मंजुरी न देणे, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मंजुरी न देणे, स्वेच्छानवृत्ती वेतन अमलात न आणणे, वैगरे न्याय्य मागण्यांसाठी शिक्षक कर्मचारी-शिक्षक सेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिक्षणधिकार्‍यांना लेखी पत्र देऊन आठ दिवस झाले, मात्र तरीही प्रशासनाने आणि शिक्षणाधिकार्‍यांनी अद्यापही पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे शिक्षक वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.

Post Bottom Ad