मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 December 2014

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाइनवर रविवार, १४ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी १0 ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सकाळी ९.0८ ते दुपारी २.२५ वाजेपर्यंत डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. सीएसटीसाठी ठाणे स्थानकातून अप जलद मार्गावरून सुटणार्‍या सर्व लोकल सकाळी १0.४६ ते दुपारी ३.२८ वाजेपर्यंत मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २0 मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच ब्लॉकदरम्यान सीएसटीला येणार्‍या आणि जाणार्‍या धिम्या मार्गावरील सर्व लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. त्याचबरोबर डाऊन दिशेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या सकाळी ११.२१ ते दुपारी २.४३ वाजेपर्यंत ठाणे स्थानकांनंतर कल्याण स्थानकापर्यंत डाऊन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच सकाळी ११.४0 ला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी १६३४५ नेत्रावती एक्स्प्रेस दुपारी २.३0 ला चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सकाळी १0.२0 ते दुपारी ३.0४ वाजेपर्यंत दरम्यानची कुर्ला ते मानखुर्ददरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि मानखुर्द ते पनवेलदरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १0 ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेन लाईन आणि ट्रान्सहार्बर मार्गाने प्रवास करू शकतात.

Post Bottom Ad