मुंबई ( जेपीएन न्यूज ): मुंबईतील अति महत्वाच्या ठिकाणी आणि जिथे अपघात घडतात त्या ठिकाणी किवा जास्त शक्यता आहे त्या ठिकाणी रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत अशी सुचना आज महा पालिकेच्या प्रभाग समस्या निवारण समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली.
मुंबईमध्ये शाळा, हॉस्पिटल्स, दवाखाने अशा महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक बसवण्यात आले पाहिजेत अशी सुचना यावेळी करण्यात आली , असे गती रोधक बसवण्यासाठी विविध प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात, त्यामुळे अशी कामे रखडतात . अशा विविध परवानगीची कामे मध्यवर्ती संस्थेला देण्यात यावीत , त्यामुळे कामे रेंगाळणार नाहीत आणि जलद कामे होतील अशी सुचना आज या समितीतील सदस्यांनी केली . या बैठकीमध्ये महापौर स्नेहल आंबेकर, आयुक्त सीताराम कुंटे , उप महापौर अलका केरकर, शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार आणि सर्व अतिरिक्त आयुक , नगरसेवक असे उपस्थित होते. Post Top Ad
19 December 2014
Home
Unlabelled
महत्वाच्या स्थळी गतिरोधक बसवण्याची पालिकेस सुचना
महत्वाच्या स्थळी गतिरोधक बसवण्याची पालिकेस सुचना
Post Bottom Ad
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.