प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मरेची नामी योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2014

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मरेची नामी योजना

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र, चेन खेचणे, मोबाइल फोन चोरीला जाणे, सामान चोरीला जाणे, महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन करण्याच्या तक्रारींचा संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास देण्याकरता एक योजना आखली आहे. या योजनेनुसार जे प्रवासी असे गुन्हे करणार्‍यांची नावे आणि ते करत असलेल्या गुन्ह्याचे मोबाइल रेकॉर्डिंग करतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.

रेल्वे आणि रेल्वे परिसरात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांनीच सजग होऊन आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, याची माहिती ठेवणे आता गरजेचे होऊ लागले आहे. रेल्वे परिसरात आणि लोकल ट्रेनमध्ये घडणार्‍या एखाद्या गुन्ह्याची माहिती आणि त्याचे पुरावे जर प्रवाशांकडे असतील, तर ते त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे द्यावयाचे आहे. चोरी, चेन स्नॅचिंग, मोबाइल-लॅपटॉप चोरणे किंवा महिलांशी असभ्य वर्तन अशा गुन्ह्यांची यामध्ये दखल घेण्यात येणार आहे. जे पुरावे रेल्वेकडे सादर केले जातील, त्याआधारे त्या गन्हेगाराविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात येणार आहे. एखाद्या प्रवाशाने अशा पद्धतीने सादर केलेल्या पुराव्यामुळे त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील माहिती दिल्यास ५ हजार, तर चेन खेचण्याच्या चोरीची माहिती देणार्‍यास १ हजार रुपयांचे बक्षीस रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.

Post Bottom Ad