थंडीने मुंबईमधील 'ताप' उतरला ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2014

थंडीने मुंबईमधील 'ताप' उतरला !

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : गेल्या महिन्यात ताप, मलेरिया आणि डेंग्यूने डोके पुन्हा वर काढल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेलाच हुडहूडी भरली होती. पण या महिन्याच्या सलग तीन आठवड्यांत या तिन्ही आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येचा 'पारा' खाली उतरला आहे. गेल्या महिन्यात तापाचे आठ हजार ५६६ रुग्ण असताना, या महिन्यात आत्तापर्यंत चार हजार ३३0 तापाच्या रुग्णांची नोंद झाल्याचे पालिकेने कळविले आहे. 

नोव्हेंबरात मलेरिया आणि डेंग्यूचे अनुक्रमे ८३१ आणि १४६ रुग्ण आढळले होते, पण डिसेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात या दोन्ही विकारांचे अनुक्रमे एकूण ४२४ व ४0 रुग्ण आढळले आहेत. तसेच गॅस्ट्रोच्याही रुग्णांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत ७४१ वरून ५३६ वर आली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ८७२ इतकी होती. विषमज्वराच्या रुग्णांचीही संख्या १२७ वरून घटून ५३ इतकी नोंद झाली आहे. काविळीचा एकही रुग्ण या महिन्यात आढळला नाही.

Post Bottom Ad