मुंबई : महाराष्ट्र राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक बाबतीत प्रगती केली असली तरी आजही राज्यात अनुसूचित जातींवर होणोर अत्याचारांची संख्या काही केल्या कमी होत नाही. राज्यात दररोज अनुसूचित जातींवर अन्याय, अत्याचार होत असून २0१३मध्ये यामध्ये वाढ झाली असल्याची माहिती सीआयडीच्या क्राईम इन महाराष्ट्र २0१३ च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावरून राज्यात सामाजिक प्रगती नेमकी कशा पद्धतीने होतोय, याची कल्पना येते.
भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान हक्क प्रदान केलेले आहेत. कोणताही धर्म, जात, लिंग यावरून भेदभाव केला जाणार नाही, याबाबत घटनेच्या कलम ३८, ३९ व ४६ अन्वये नागरिकांना शाश्वती देण्यात आली आहे. तरीसुद्धा राज्यात अनुसूचित जातींवर अन्याय होतच आहे. २0११च्या जनगणणेनुसार राज्यातील अनुसूचित जातींची लोकसंख्या १,३२,७५,८९८ इतकी आहे. २0१३मध्ये राज्यात अनुसूचित जातीच्या सदस्यांवरील अत्याचाराचे एकूण १६७८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २0१२मध्ये १0९९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये हिंसामय गुन्ह्यांमध्ये ५९.७९ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. २0१३मध्ये अनुसूचित जातींच्या व्यक्तीवरील अत्याचारांच्या दाखल गुन्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त गुन्हे (९९) दाखल झाले आहेत. तर पोलीस आयुक्तालयांचा विचार करता २0१३मध्ये अनुसूचित जातींवरील अत्याचाराचे सर्वात जास्त गुन्हे पुणे शहरात (४४) दाखल झाले आहेत.

अनुसूचित जातीचे दाखल गुन्हे
२00८ २00९ २0१0 २0११ २0१२ २0१३
खून २३ २७ २४ २६ ३६ ४0
बलात्कार ९३ १0५ ८९ ९५ ९७ १७९
अपहरण-पळवून नेणे २४ १0 २५ १२ २३ ३३
दरोडा १७ २0 २२ १६ १६ २६
जबरी चोरी ६ ८ २0 १२ १३ २२
जाळपोळ १0 ८ १२ ७ ९ १0
दुखापत ९७ ५६ ७७ ८४ ८१ १६७
नागरी हक्क संरक्षण कायदा २0 २४ २५ १0 ५ २१
अत्याचार प्रतिबंधक कायदा ३३४ २९१ ३१९ ३0४ २६७ २७७
इतर गुन्हे ५६८ ५४७ ५१९ ५७७ ५४४ ९0३
एकूण ११९२ १0९६ ११३२ ११४३ १0९१ १६७८