मुंबईमधील २००० नंतरच्या झोपड्यानाही पालिका पाणीपुरवठा करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2014

मुंबईमधील २००० नंतरच्या झोपड्यानाही पालिका पाणीपुरवठा करणार

पाण्याची चोरी बंद होणार 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई मध्ये ठिकठिकाणी पाण्याची चोरी होत असल्याने सामान्य गरीब व झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त पैसे देवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाण्याच्या होणाऱ्या चोरी मधून पालिका अधिकाऱ्यांचे खिसे भरले जात असल्याने आता पाण्याची चोरी बंद होण्याच्या दृष्टीने पालिकेने सर्वच मुंबईकर नागरिकांना अधिकृत पाणी  देण्याचा निर्णय घेण्याची तयारी केली आहे माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 
 
सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना सरकारने अधिकृत ठरवले आहे. पालिका सन २००० पर्यंतच्या झोपड्याना पाणीपुरवठा करत होती. पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने २००० नंतरच्या झोपड्यांना पाणी कनेक्शन देण्यास विरोध केला होता. सन २००० नंतरच्या झोपड्यांना अधिकृतरित्या पाणीपुरवठा केला जात नसल्याने या झोपड्यांना अनधिकृत पणे पालिका अधिकारी आणि पाणी माफिया यांच्या संगनमताने जास्त किमतीत पाण्याची चोरी करून पुरवले जात होते. 

मुंबईला ३७५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यापैकी मुंबईकर नागरिकांपर्यंत पाणी पोहचे पर्यंत ७०० एमएलडी पाण्याची गळती होते तर १६० एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याने पालिकेचा महसुल बुडत होता. आता सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने मुंबई मधील सन २००० नंतरच्या झोपडीधारकानाही पाणी देण्याची तयारी दर्शवली आहे. सत्ताधार्यांनी आता अशी तयारी दर्शवली असल्याने पाण्याची चोरी कमी होणार असून महानगर पालिकेलाही महसूल मिळणार आहे. पालिका प्रशासन तसा प्रस्ताव लवकरच पालिकेच्या स्थायी समितीमध्ये आणणार आहे अशी माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.   

Post Bottom Ad