मुंबई ( जेपीएन न्यूज ) :
मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना 'हाफ चड्डी'चा गणवेष देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. या विद्यार्थ्यांना 'फुल पॅण्ट'चा गणवेष देण्याची मागणी करणारे पत्र राष्ट्रवादीने शिक्षण समितीच्या अध्यक्षांना दिले आहे. महापालिकेच्या शाळेतील ५वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांपासून 'फुल पॅण्ट' देण्याची ठरावाची सूचना शिक्षण समितीने मंगळवारी संमत केली.
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना पालिका मोफत गणवेष देते; पण इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'हाफ पॅण्ट' देऊ नये, त्यांना 'फुल पॅण्ट' असलेला गणवेष द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. पाचवी ते सातवीमध्ये शिकणारे विद्यार्थी १२ ते १४ वर्षे या वयोगटातील असतात. त्यामुळे ड्रेस कोडमध्ये न बसणारी फुल पॅण्ट घालून जातात. यामुळे पालिकेचा गणवेष देण्याचा उद्देश सफल होत नाही. विद्यार्थ्यांना फुल पॅण्ट देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे फक्त ५0 रुपये जास्त खर्च येणार आहे, असे सईदा खान म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ही भूमिका घेतल्यामुळे शिक्षण समितीचे अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे समितीचे लक्ष लागले होते; पण ही ठरावाची सूचना समितीने संमत केली.

सर्वच शाळांत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावणार!पालिका शाळेचे मुख्यद्वार, शाळेचा परिसर आणि आतील पॅसेजमध्ये सीसीटीव्ही संच लावण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे शेलार म्हणाले. महापालिकेच्या शाळेत सीसीटीव्ही संच बसवण्याची मागणी एक वर्षांपासून होत असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासन गंभीर दिसत नाही, काहीच कृती करत नाही, असा आरोप शिक्षण समितीच्या बैठकीत समाजवादी पक्षाच्या नूरजहाँ शेख यांनी केला. पालिकेच्या सर्वच शाळा, इमारती यात सीसीटीव्ही संच बसवण्यासाठी निविदा काढले जाईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त सुनील धामणे यांनी या वेळी दिली.