पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या वस्तू दर्जाहीन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 December 2014

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या वस्तू दर्जाहीन

मुंबई महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दिल्या जाणार्‍या विविध २७ वस्तूंचे अखेर 'थर्ड पार्टी ऑडिट' होणार आहे. या वस्तूंचा दर्जा चांगला नसतो आणि या वस्तूंचे दरही अवास्तव, महागडे असतात, अशा तक्रारींचा भडिमार नगरसेवकांनी केल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. या सर्व वस्तूंची खरेदी व दर्जा आदी मुद्दय़ांचे त्रयस्थाकडून 'ऑडिट' करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

अंधेरी येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्मेंट इंस्टिट्युट) या संस्थेकडून हे परीक्षण करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रतिनिधी महापालिकेच्या ५0 शाळांना भेट देणार आहेत. त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात येईल. या परीक्षणासाठी पालिका २0 लाख रुपये खर्च करणार आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गणवेश, दप्तर, रबर-पेन्सिल-वह्या, बूट आदी २७ विविध वस्तू दिल्या जात असून त्यांचा दर्जा आणि त्यांच्या खरेदीची किंमत याविषयी नगरसेवकांनी वारंवार संशय व्यक्त केला आहे. नगरसेवकांच्या टीकेमुळेच प्रशासनाला हे परीक्षण करण्याची वेळ आली आहे. स्थायी समितीच्या येत्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.

Post Bottom Ad