मुंबई ( जेपीएन न्यूज ): अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने गोरेगाव येथे माहितीच्या आधारावर सापळा लावून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीचा अँम्फेटामाईन हा एमडी अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमली पदार्थांच्या तस्करीला, व्यसनाला आळा घालण्यासाठी दक्षिण मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाला मुंबई आणि उपगनरात कोठेही अमली पदार्थांची विक्री वा व्यसन करणार्यांची माहिती मिळाली की, तेथे छापा टाकण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे गोरेगाव, आरबीएस गार्डनमध्ये काही तरुण अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार, अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने गोरेगाव येथील आरबीएस गार्डनमध्ये सापळा लावला.
तेथे आलेल्या इमरान अब्बास शेख (३0), जावेद नासिर खान (२६), हैदर कमरुद्दीन शेख (३२) आणि कासिम आरिफ मेमन (२९) चार तरुणांची संशयास्पद हालचाल जाणवताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता चौकडीकडून ५१ ग्रॅम अँम्फेटामाईन हे एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. या अमली पदार्थाची किंमत ४ लाख ८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.