मरेच्या २४ प्लॅटफॉर्मची उंची येत्या ६ महिन्यांत वाढणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2014

मरेच्या २४ प्लॅटफॉर्मची उंची येत्या ६ महिन्यांत वाढणार

मुंबई : प्लॅटफॉर्म आणि उपनगरीय लोकलमध्ये गॅप राहात असल्याकारणाने अपघात घडत आहेत. जानेवारीमध्ये घाटकोपर येथे मोनिका मोरे या तरुणीला अपघात झाल्यामुळे गॅपमध्ये सापडून तिचे दोन्ही हात गमावले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मध्य रेल्वेने कमी उंची असलेल्या ८३ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी २४ प्लॅटफॉर्मची उंची येत्या ६ महिन्यांत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी १0 कोटी ५१ लाख रुपयांचे टेंडर मंजूर झाले असून काम सुरू करण्यात आले आहे. 
मध्य रेल्वेच्या हद्दीत एकूण ७६ रेल्वे स्थानके आहेत. त्यामध्ये २७३ प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी २४३ प्लॅटफॉर्म धीम्या मार्गावरील, तर ३0 प्लॅटफॉर्म जलद मार्गावरील आहेत. त्यापैकी १९0 प्लॅटफॉर्मची उंची ८४0 एमएम किंवा त्यापेक्षा अधिक असल्याने त्यांची उंची वाढवण्यात येणार नाही. उर्वरित ८३ प्लॅटफॉर्मपैकी २४ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी टेंडर मंजूर झाले असून मे २0१५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी १0 कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी ५ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असून ४ प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे.

मध्य रेल्वेच्या उरलेल्या ५९ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी ३१ कोटी ७६ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी २0 नोव्हेबंरला टेंडर खोलण्यात आले असून मे २0१६ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
स्थानक - प्लॅटफॉर्म - प्रगतीघाटकोपर - १ आणि २ - काम पूर्ण 
चेंबूर - १ आणि २ - काम पूर्ण
ठाणे - ३ आणि ४ - प्रगतीपथावर
सॅण्डहस्र्ट रोड - १ आणि २ - प्रगतीपथावर 
मस्जिद बंदर - १ आणि २ - प्रगतीपथावर 
रे रोड - २ - प्रगतीपथावर 
कॉटनग्रीन - २ - प्रगतीपथावर 
वडाळा - १ - प्रगतीपथावर 

Post Bottom Ad