मानखुर्दमध्ये रविवारी पाणी परिषद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2014

मानखुर्दमध्ये रविवारी पाणी परिषद

मुंबई ( जेपीएन न्यूज ): मानखुर्द येथील भीषण पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रविवारी सायंकाळी ६ वाजता पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी खासदार किरीट सोमय्या हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मानखुर्द-शिवाजी नगर विभागातील नागरिक अजूनही पाणीमाफियांचा हैदोस, पाणीचोरी, अपुरा पाणीपुरवठा, तीव्र पाणीटंचाई यांसारख्या समस्यांनी त्रस्त आहेत. या पाणी परिषदेत स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने त्यांच्या सूचनांच्या आधारे नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे पाणी परिषदेचे आयोजक राजेंद्र पाटोळे यांनी दिली. कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई अध्यक्ष शरद कांबळे, झोपडपट्टी विभागाचे अनिल ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Post Bottom Ad