युबर कॅब-प्रायव्हेट कॅब टॅक्सींवर बंदी घालण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2014

युबर कॅब-प्रायव्हेट कॅब टॅक्सींवर बंदी घालण्याची मागणी


मुंबई : दिल्लीमध्ये एका प्रायव्हेट कॅब टॅक्सीच्या ड्रायव्हरने एका महिलेवर केलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. मुंबईमध्येदेखील अशा अनेक प्रकारच्या फोन फ्लीट टॅक्सीची सेवा सुरू आहे. त्यापैकी युबर कॅब आणि प्रायव्हेट कॅब टॅक्सींना मुंबई शहरामध्ये बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदनही परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहे.
मुंबईमध्ये एकूण सुमारे ३५ हजार टॅक्सी धावतात. त्यामध्ये पायव्हेट कंपनीच्या टॅक्सी आणि काळ्यापिवळ्या टॅक्सी आहेत. मुंबईत मोठय़ा प्रमाणात महिला प्रवासी वर्ग आहे. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता शहरातील श्योर टॅक्सी, ओला कॅब, जिनी कॅब, मेरू प्लस आणि ओवल कॅब अशा टॅक्सींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे करण्यात आली आहे.

मुंबईतील टॅक्सीवाले हे अवैध व्यवसाय करीत असून त्यांच्यावर अंकुश ठेवून कारवाई करण्यात यावी, अशीदेखील मागणी युनियनतर्फे करण्यात आली आहे. मुंबईतील काही फोन फ्लीट टॅक्सींच्या कंपन्यांकडे स्वत:च्या टॅक्सी नाहीत. त्या परिवहन विभागाकडे मोठी रक्कम भरून परमिट घेतात. तसेच आपल्या कंपनीशी टॅक्सीचालकांना जोडून घेतात. त्याबदल्यात टॅक्सीवाल्यांक डून कमिशन घेतात.

त्याबदल्यात आपल्या कंपनीच्या लोगोनुसार ते टॅक्सी चालवण्यास देतात. अशा टॅक्सीचालकांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे करण्यात आली आहे. तसे निवदेनही परिवहन आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच परिवहन विभागाने अशा टॅक्सीवर बंदी घातली नाही, तर शहरात जी परिस्थिती निर्माण होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा

युनियनतर्फे देण्यात आला आहे.

Post Bottom Ad