आरपीएफ जवानांना मोबाइलवर चॅटिंग वा बोलणे महागात पडणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2014

आरपीएफ जवानांना मोबाइलवर चॅटिंग वा बोलणे महागात पडणार

मुंबई ( जेपीएन न्यूज ) : रेल्वे प्रवाशांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानांना यापुढे मोबाइलवर चॅटिंग वा बोलणे महागात पडणार आहे. जवानांची मोबाइलवरील ही 'व्यस्तता' प्रवाशांनी कॅमेर्‍यात कैद करावी आणि ते छायाचित्र सीएसटी येथील आरपीएफच्या मुख्यालयाकडे पाठवावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) ए. के. सिंग यांनी केले आहे.

मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या या आवाहनानुसार लोकलच्या डब्यांत कर्तव्य बजावणारा आरपीएफ जवान मोबाइलवर सतत बोलत वा चॅटिंग करताना दिसल्यास प्रवासी त्याचा फोटो काढू शकणार आहेत. या फोटोच्या आधारे प्रवासी आरपीएफ मुख्यालयाकडे रीतसर तक्रारही नोंदवू शकणार आहेत. आरपीएफ जवान कर्तव्यापेक्षा मोबाइलवर अधिक वेळ व्यस्त राहत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर मुख्य सुरक्षा आयुक्तांनी ही नवी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत दोषी आढळणार्‍या आरपीएफ जवानांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad