मध्य रेल्वेवर बम्बार्डियर लोकलचा मार्ग मोकळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2014

मध्य रेल्वेवर बम्बार्डियर लोकलचा मार्ग मोकळा

मुंबई ( जेपीएन न्यूज ): गेल्या १८ वर्षांपासून मध्य रेल्वे मार्गावर रखडलेले डीसी-एसी विद्युत प्रवाह परिवर्तनाचे काम रविवारी अखेर पूर्ण झाले. शनिवारच्या रात्री मध्य रेल्वेने सीएसटी-कल्याण दरम्यान सर्व मार्गावरील डीसी विद्युतप्रवाह बंद करून एसी विद्युत प्रवाह चालू केला. रात्रभर या मार्गावर ४ वेळा चाचण्या केल्यानंतर सकाळी पुन्हा हा विद्युत प्रवाह डीसीवर वळवण्यात आला. विद्युत परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यामुळे मरेवर नव्या बम्बार्डियर लोकल चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डीसी-एसी परिवर्तनादरम्यान सीएसटी ते कुर्ला या मार्गावर ३४ ठिकाणी जंपर्स बसवण्यात आले होते. एका प्रकारचा विद्युत प्रवाह बंद करून त्या जागी दुसर्‍या प्रकारचा विद्युत प्रवाह जोडण्यासाठी हे जंपर्स आवश्यक असतात. जंपर उघडून त्यांना संबंधित विद्युत प्रवाहाशी जोडावे लागते. जंपर उघडून डीसी विद्युत प्रवाहाऐवजी तो एसी विद्युत प्रवाहाला जोडण्यात आला. सध्या मध्य रेल्वे मार्गावर ८0 किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या धावतात. मात्र, एसी विद्युत प्रवाहावर या गाड्या १00 किमी. प्रतितास या वेगाने धावतील.

Post Bottom Ad